| Login | | Screen Reader |
swami vivekananda photo
college logo
swami vivekananda photo
Vivekanand Shikshan Sanstha's
Vivekanand Arts, Sardar Dalipsingh Commerce and Science College
Samarth Nagar, Aurangabad - 431001 (M.S.) India.
AISHE No.: C-34524, UDISE No: 27191106109

Department of Marathi

Quick Links

  1. Home
  2. Courses
  3. List of Alumni
  4. Faculty

HOD's Desk

मराठी भाषा ... दोन शब्द
मराठी साहित्याला मराठी मातीचा, मराठी माणसाचा तसाच मराठी जीवनाचा एक सकस सांस्कृतिक वारसा आहे त्याचे पडसाद मराठी साहित्यात स्पष्टपणे दिसतात जसे मराठी साहित्यात प्रादेशिक भाषेचा, बोलीचा व लोकजीवनाचा प्रत्यय येतो तसेच त्या त्या प्रादेशिक लोक कलांचा लोकगीतांचा, लोकसंगीताचा, लोकनृत्याचा सहभागही त्या प्रादेशिकतेचा साहित्यात ठसा उमटवतो त्या त्या भागातील लोकसंस्कृती तिथली पिढ्यान पिढ्या चालणारी भक्तीची अनेक इंद्रधनुष्यी किरणही पहायला मिळतात . भजनात, ओव्यात, सणासुदीच्या निमित्ताने गायली जाणारी लोकगीत या सगळ्याचा अंतर्भाव तिथल्या लोकजीवनात पहावयास मिळतो. जत्रा, यात्रा, उत्सव, शेतीच्या प्रत्येक हंगामात तिथल्या जीवनात शेतकऱ्यांच्या मेहनतीला विरंगुळ्याची जोड म्हणून गायली जाणारी गीते. कृषी परंपरेतील सणांच्या निमित्ताने वाजवले जाणारे विविध वाद्य, त्यावर आधारित लोकनृत्य हा ही त्या लोकसंस्कृतीचे महत्वाचे अंग होय. या सगळ्या वाङमयातील विविध शाखांचा अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने शिकवतो, त्याच प्रमाणे त्यांचे प्रात्यक्षिकही त्यांना शिकऊन त्यांच्या कडून करुन घेणे आणि वेगवेगळ्या स्पर्धांतून ते सादर करणे हे या मराठी विभागाचे ठळक वौशिष्ट्ये आहे. मराठी विषयाचा अभ्यास करनाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मर्यादीत नसून महाविद्यालयाच्या 11 वी च्या वर्गापासून् ते पदव्युत्तर विभाग आणि कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विभाग हे कार्य गेल्या 31 वर्षापासून अविरत करत आहे.

वेळापत्रकाप्रमाणे महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या तासिका घेऊन उरलेल्या वेळात कोणत्याही मानधनाशिवाय हे कार्य अखंडपणे चालू आहे. याचाच प्रत्यय म्हणून विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रिय युवक महोत्सवात सलग 16 वर्षे सर्वसाधारण विजेते पद पटकावले व 7 वर्षे दुसऱ्या क्रमांकाचे महाविद्यालयाची घोडदौड कायम ठेवली. मराठी भाषा सर्वच शाखांच्या विद्यार्थ्याना अवगत व्हावी त्यातले बारकावे व ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी नेमून दिलेल्या तासिकेनंतरच्या वेळेत हा उपक्रम राबवला जातो त्यासाठी वेळेची निश्चिती नाही. प्रसंगी रात्रीपर्यंत हे कार्य चालू असते. संत साहीत्यातील नामदेव, ज्ञानेश्वर , तुकारामापासून आधुनिक काळातील कवी पर्यंतचा धावता वाङमयाचा इतिहास सर्वच शांखापर्यंत पोहचवण्याचे कार्य अविरत आजपर्यंत चालू आहे. परिणामी मराठी विभागाच्या माध्यमातून मुलांना मराठी, हिंदी सिरीयल, तसेच हिंदी , मराठी चित्रपटात रोजगार मिळू लागला आहे. व्यावसायिक नाटकांमधून बऱ्याच विद्यार्थ्यांची उपजिवीकेचा प्रश्न सोडण्यात विभागाला यश मिळाले आहे. प्रत्यक्षात मराठी विषय घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मराठी विषयाच्या अध्यापनात आपला ठसा उमटवला आहे. विभागातून गेलेले अनेक विद्यार्थी चित्रपटाचे लेखन सिनेगीतांचे लेखन चित्रपटाचे दिग्दर्शन, अभिनय अशा चौफेर क्षेत्रात नाव कमावले आहे. तर बऱ्याच विदयार्थ्यांनी मराठीतले प्रसिध्द कवी, कथालेखक, सूत्रसंचालकाच्या क्षेत्रात नाव कमावले आहे. मराठी साहित्याने माणूस समृध्द करण्याचा मूळ हेतू मराठी विभागाने अभिमानास्पद सफल केला. मराठी विभागातले अध्यापक आपआपल्या क्षेत्रात नामवंत आहेत. कोणी संत साहित्याचा गाढा अभ्यासक, कोणी आधुनिक साहित्याचा भाष्यकार कोणी कवितेच्या क्षेत्रात घौडदौड करणारे तर कोणी मराठी भाषेची समीक्षा व व्याकरणात तज्ञ आहेत यामुळे एकूण मराठी साहित्यातल्या चौफेर व्यासंगामुळे मराठी विभाग अध्यापकांमुळे आणि विद्यार्थ्यांमुळे समृध्द झाला याचा आम्हाला मनःस्वी आनंद आहे.
धन्यवाद..........

प्रा. दिलीप नागोराव महालिंगे मराठी विभाग प्रमुख व सांस्कृतिक विभागप्रमुख

View All

News & Events

View All